Total Pageviews

Popular Posts

Wednesday, November 9, 2011

जगणं शेअर करावं...नमस्कार!

९ नोव्हेंबर २०११...
माझ्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मी रसिक मित्रांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने माझ्या Blogचं निर्माण करतो आहे.

मला माझे किती चाहते आहेत .. खरचं ठाऊक नाही...
या blogवर मी पुढे किती नियमित असेन माहित नाही.... कारण मी तसा Computer Savy नाहीय्...
जग इतकं पुढं चाललेलं असताना मी का इतका उदासीन आहे, या बाबतीत ठाऊक नाही...
कदाचित एखादा कॉप्लेक्स असेल... कदाचित आपण कोण एवढे असं वाटत असेल...
कदाचित वेळेचा प्रश्न असेल... कदाचित..
मला माहित नाही.. पण आता माझे मित्र
सुभाष इनामदार
यांच्या आग्रहाखातर मी तुमच्याशी संवाद साधू पाहतो आहे...
माझी किती कामं तुम्ही पाहलीत... किती कविता वाचल्यात... माहित नाही.

पण तरी माझं जगणं थोडंथोडं share करत रहावं असं वाटू लागलयं...
म्हणून हा प्रयत्न....तुमचाच,
सौमित्र...
Email_kishorkadam@gmail.com


एक कविता थोडी आठवली ती देत आहे...


माझ्यासोबत समुद्राच्या
ख-या खोट्या बाता येतील
मला शोधत जाल तेंव्हा
अनेक वळण वाटा येतील
मी जसा आहे तसा
Please पाहू नका मला
माझा फोटोच काढाल तर
त्यात फक्त लाटा येतील

सौमित्र

www.saumitrakishor.blogspot.com